दूधदरवाढ आंदोलनात ऊत्सुर्फतपणे सहभागी व्हा : डॉ. नवले
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे वैजापूर तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, जि. प. सदस्य पंकज ठोंबरे, शिवसेनेचे रमेश सावंत, लाखगंगाचे सरपंच दिंगबर तुरकणे, सामाजिक कार्येकर्ते प्रशांत टेके, केशव मोरे, अण्णा मोरे, संभाजी तुरकणे आदी उपस्थित होते. यावेळी मौजे लाखगंगा येथील ग्रामसभेत दि.३ मे पासूनपासून शासनाला मोफत दूध देण्याचा ठराव मांडण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सर्वानुमते तो समंत केला. आता वैतागलेल्या दूधउत्पादक बांधवांनी ठरवले आहे. की शासनाला फुकट दुध द्यायचे. तसेच प्रत्येक तालुक्यातील दुधउत्पादक तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. नंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देतील. अशाप्रकारे ही प्रक्रिया पुढे मंत्रालयापर्यंत जात राहिल. जोपर्यंत दुधाच्या हमीभावाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून त्याही व्याप्ती वाढतच राहिल. दूध उत्पादक बांधवांनी दुधाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवले यांनी केले आहे. यावेळी ग्रामसभेसाठी शेतकरी, दूध उत्पादक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
