… तरच डॉ. आंबेडकरांचा आदर्श प्रस्थापित होईल : प्रा. साळुंखे
राहता तालुक्यातील कोल्हार येथे भारतरत्न बहुजन उत्सव समिती व भीमशक्ती मंडळाच्या संयुक्त डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याखान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अँड़. सुरेंद्र खर्डे होते. भगवती देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, उपसरपंच स्वप्नील निबे, प्रवरा बँकचे उपध्य्क्ष अशोक असावा, ग्रामपंचायतचे सदस्य पंढरीनाथ खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, लवलेस लोखंडे, डॉ. जौरमा खंडेलवाल, भास्कर खर्डे, श्याम गोसावी, दिलीप बोरुडे, दगडू बोरुडे, संजय लोखंडे, संदीप लोखंडे यावेळी उपस्थित होते. प्रा. प्रमोद साळुंखे म्हणाले, तुम्ही कुणाचाही झेंडा घ्या. पण त्या झेंड्याला शाहू, फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दंड राहू द्या. राज्यघटना ज्यांनी लिहिली, त्यांचा आदर करा. केवळ जयंती साजरी उपयोग नाही तर त्यांचा आदर्श घ्या. या पुढे भीमाकोरेगाव, कोपर्डीसारख्य घटना करू पाहणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवा. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहली. तुम्ही कमीतकमी कलेक्टर बना. मंत्रालयाचा दिवा घरी येईपर्यंत तो राहील की नाही, याचा भरवसा नाही. पण कलेक्टरच्या वाहनाचा दिवा मरेपर्यंत राहील, असे व्याखाते प्रा. साळुंखे म्हणाले.
