Breaking News

जिल्ह्यात शिवदीप लांडेच यावेत


बारागावनांदूरमध्ये किशोर माळी आणि त्याच्या भावाची प्रचंड दहशत आहे. या मुलीच्या अपहरणाची किशोरनेच मदत केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या माळी बंधूंच्या दहशतीमुळे उच्चभ्रू घरातील मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पैसे आणि दहशतीच्या जोरावर सामान्यांच्या मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचे प्रकार या भागांत या दोघांनी अनेक दिवसांपासून चालविले आहेत. जिल्ह्यातील अशा गुंडांची पाळेमुळे नाहीशी करण्यासाठीच बिहारचे धाडसी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी नगरला येण्याची गरज आहे. तेच अशा गुंडांचा सफाया करू शकतील, अशी अपेक्षा तमाम राहुरीकरांमधून व्यक्त होत आहे.