बेलापूर बु !! येथील साई पावन प्रतिष्ठाण यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा साईरत्न समाजप्रबोधन पुरस्कार यावर्षी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील राष्ट्रीय प्रबोधनकार भारुड सम्राट हमीद अमिन सय्यद यांना नुकताच शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने ,शिर्डी च्या नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त योगिता शेळके ,विश्वस्त प्रताप भोसले,शिर्डी चे नगरसेवक अभयराजे शेळके,श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सचीन गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. हमीद सय्यद यांनी भारुडाच्या रंगी या कार्यक्रमातून संत एकनाथांच्या लोप पावत चाललेल्या भारुड परंपरेला नवसंजवणी देण्याचे काम करत असुन भरकटत चाललेल्या तरुणाईला व्यसन मुक्ती ,ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्री भ्रुण हत्या,पर्यावरण संरक्षण याबाबत शाहिरी-भारुड आदिच्या प्रभावी सादरीकरणातुन जिवन जगण्याची अचूक वाट दाखवून दिली जात आहे.
समाजप्रबोधनकार हमीद सय्यद यांना साईरत्न पुरस्कार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5