Breaking News

समाज साक्षर व्हावा हे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न - सावंत


दहिगावनेे प्रतिनधी - पारतंत्र्यात वावरणारा, अंधश्रध्देला बळी पडलेला, जातीपातीत विभागलेला, गुलामगिरी अन्याय, अपमान, त्रास सहन करणारा, अस्पृश्य समजला जाणारा, ठराविक लोकांची मक्तेदारी सोसणारा, महापुरुषां मागे विभागण्यात भाग पडलेला दिन दलित समाज शिकुन साक्षर व्हावा हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते आजच्या पिढीने आत्मसात करून हक्काचे जिवन जगावे असे मत ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कर्यक्रमात साहित्यिक सावंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच डॉ अरूण पवार होते. तर प्रमुख व्याख्याते भाऊसाहेब सावंत, संजुबाबा गायकवाड, गणेश निकम, डॉ संभाजी काळे, रामकिसन जाधव, सरपंच सुभाष पवार उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे युनुस शेख, बाळासाहेब पानकर, शहनवाज शेख, अशोक वाघ, गणेश मुळे, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयोजकांनी नाचुन नाही तर वाचुन जयंती साजरी करा हा संदेश आत्मसात करून डिजेला फाटा देत महापुरुषांच्या जिवनावर मौलिक व्याख्यान आयोजित केले. यात संकेत शिदोरे व आ दित्य जगदाळे या लहान मुलांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवदान कांबळे, सुंदर कसबे, दिपक कांबळे, प्रा सुधाकर कांबळे, रामनाथ कसबे, मेजर बबन कांबळे, शौकत पठाण, नितीन कांबळे, वाजिद शेख, पांडुरंग खंडागळे, चंद्रकांत कांबळे, राजु शेख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी केले सुत्रसंचालन रामजी शिदोरे यांनी तर आभार रामकिसन जाधव यांनी व्यक्त केले.