'एवढ्या मोठ्या देशात एक-दोन बलात्कार घडणे स्वाभाविकच'
महिला आणि बालिकांवरील बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे देशभरात संताप व्यक्त होत असताना केंद्रीय श्रम आणि रोजगार खात्याचे मंत्री संतोष गंगवार यांनी यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. भारतासारख्या प्रचंड आकारमान असलेल्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडणे स्वाभाविक आहे. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही, असे गंगवार यांनी म्हटले आहे. गंगवार यांनी शनिवारी बरेलीमध्ये पत्रकारांशी बोलताना ही मुक्ताफळे उधळली.
