एका युवकास तिघा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री (दि. २०) ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत भागचंद भिंगारदिवे (वय २८, रा. शिवसंग्राम हॉटेल मागे, माळीवाडा, नगर) या युवकास मोसिन सादिक शेख (रा. पारशा खूंट) व इतर दोन अनोळखी इसमांनी तू रेहाणच्या घरच्यांना का भडकावतो असे म्हणत जबर मारहाण केली. तसेच भिंगारदिवे याच्या खिशातील ६०० रु, आधारकार्ड व एटीएमकार्ड बळजबरीने घेवून गेले. याप्रकरणी भिंगारदिवे याच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोसई. बी. यु. बोडखे हे करीत आहेत..