Breaking News

भाऊसाहेब चेके यांची निवड


शेवगाव जिल्हा सहकारी बँकेचे शेवगाव तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब नारायण चेके यांची सहकारी बँक स्टाफ को -ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे संचालक पंडितराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी पंडितराव भोसले म्हणाले की सहकारी बँकेत भाऊसाहेब चेके यांनी बँक अधिकारी - कर्मचारी, सेवा संस्थेचे पदाधिकारी -सचिव व शेतकरी सभागृहात समन्वय घडवून आणला. बँक व सभासदांचे हित जोपासताना सभासदांत बँकेबद्दल आपुलकी निर्माण केली. सहकार खात्याच्या त्यांच्या अनुभवाचा संस्थेला फायदा होईल. सत्काराला उत्तर देताना चेके म्हणाले, हा माझा सत्कार नसून बँकेच्या सर्व कर्मचारी, सभासदांचा सत्कार आहे. कर्मचारी हितासाठी आपण योगदान देण्यास कटीबद्ध आहोत. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दौंड, पं. स. सदस्य कृष्णा पायघन, हसनापूर सेवा संस्थेचे अध्यक्ष धर्मादास ढाकणे, विष्णू कोठुळे, अनिल भुसारी, कल्याण आढाव, आर. के. खंडागळे, दीपक गायकवाड, बशीर सय्यद आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.