Breaking News

ढोरजळगाव जि. प. प्राथ. शाळेच्या विद्यार्थांचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश


शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थानी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून कृष्णा संभाजी पाटेकर इ. चौथी या विद्यार्थ्याने 300 पैकी 226 गुण मिळवुन तालुक्यात साहवा क्रमांक मिळविला आहे. तर अथर्व विकास देशमुख इ. दुसरी याने 200 पैकी 164 गुण मिळवुन तालुक्यात चौथा क्रमांक मिळविला. 

मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत उत्तेजनार्थ मध्ये अनुराग अनंत आबुङ, इ. 2 री याने 200 पैकी 144 ,मयुरी अविनाश खोसे 300 पैकी 216 गुण चौथी या विद्यार्थानी यश मिळविले आसुन त्यांना मुख्याध्यापक अर्चना नजन, शारदा ङोईफोङे, दिपीका शेळके या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अकोलकर, उपाध्यक्ष बाळासाहेब खोसे, सुधाकर लांडे, राजेन्द्र देशमुख, महादेव पाटेकर, संभाजी लांडे, डॉ.विकास जायभाये, ज्ञानेश्‍वर फसले, विजय म्हस्के , आदिसह पालकांच्या वतीने विद्यार्थांचे अभिनंदन होत आहे.