Breaking News

म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी दि. 25 ते 30 मोफत शिबिर


नगर । प्रतिनिधी - पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा आजकाल म्युच्युअल फंडस्, शेअर बाजार आदींकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. पूर्वी अगदीच कधीतरी ऐकू येणारे हे शब्द आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचे भाग झाले आहेत. नागरिकांना याबाबत मार्गदर्शनाची गरजही निर्माण झाली आहे. याचा विचार करून नगरमध्ये नवीन गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 ते 27 दरम्यान सावेडी येथील प्रोफेसर कॉलनीतील जुई अपार्टमेंटमध्ये असलेल्या रिषिका इन्व्हेस्टमेंट कार्यालयात तसेच दि. 28 ते 30 एप्रिल दरम्यान बालिकाश्रम रस्त्यावरील न्यूक्लियस हॉस्पिटलजवळ अस्मिता हाइट्समधील अर्थवेध इन्व्हेस्टमेंट कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नामवंत गुंतवणूक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जास्त लाभ कसा मिळवावा, योजनेतील बारकावे, गरजेनुसार योग्य गुंतवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.