Breaking News

क्वॅालिटी वॉरीयर्स संघाने याही वर्षी पटकविला महाविर चषक


नगर - आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लब आयोजित भगवान महाविर चषक सकल जैन टेनिस बॉल डे नाईट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिशय सुंदर खेळी करत क्वॅालिटी वॉरीयर्स संघाने यंदाही महाविर चषक पटकाविला. भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या मैदानावर जॉईज व क्वॅालिटी वॉरीयर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात क्वॅालिटी वॉरीयर्सने संघाने १२ षटकांत ९१ धावा केल्या. अंतिम षटकात एका चेंडूवर ५ धावांची गरज असताना जॉईजचा खेळाडू धावबाद झाला व ते १२ षटकात ८६ धावा करू शकले.अतिशय चुरशीच्या झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षनिय होती.त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

विजयी क्वॅालिटी वॉरीयर्स संघाचे सर्व खेळाडू व प्रकाश मुथा,प्रशांत बोकडीया,आनंद बलदोटा या तिघांच्या मातोश्री यांनी महापौर सौ.सुरेखा कदम,उद्योजक नरेंद्र फिरोदिया व आयएमएसचे संचालक डॉ. एम.बी,मेहता यांच्या हस्ते महाविर चषक व ४१ हजार रुपयांचे पारितोषिक स्वीकारले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले,अभिनंदन भन्साळी ,संदेश लोढा,बीजेएस नगरचे अध्यक्ष आदेश चंगेडीया,उद्योजक संतोष गुगळे, जामखेडचे उद्योजक दिलीप गुगळे, प्रकाश पोखरणा,सौ. मीना चोपडा,राजकुमार लुणिया ,गिरीश अग्रवाल,संदीप बोरा ,मर्चट बँकेचे संचालक संजय चोपडा व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महापौर कदम म्हणाल्या कि, प्रथमच इतका सुंदर क्रिकेटचा खेळ पहावयास मिळाला.जिंकले तरी इतिहास व हारले तरी इतिहास घडेल अशा पद्धतीने दोन्ही संघ खेळले असून अंतिम स्पर्धेतील जॉईज व क्वॅालिटी वॉरीयर्स आभिनंदनास पात्र आहेत.प्रमुख अतिथी आयएमएसचे डॉ.एम.बी.मेहता म्हणाले, आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लब आयोजित या क्रिकेट स्पर्धेमुळे नगर शहराचे नावलौकिक वाढनार असून, भविष्यात स्पर्धा राज्यस्तरावर गाजेल.