वीर एकलव्यांचे विचार आचरणात आणावे असे प्रतिपादन एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले लोणी येथे विर एकलव्य जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यात ढवळे बोलत होते. शिवाजीराव ढवळे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जयंती सोहळ्यात आरपीआयचे सुरेंद्र थोरात,अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अध्यक्षा शैलजा साबळे, डॉ.डांगे, किशोर ब्राम्हणे, एकलव्य संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास माळी, राहाता लुका अध्यक्ष अनिल रोकडे, नामदेव पवार, आरपीआयचे लोणी शहर अध्यक्ष संतोष पारखे, लोणी अध्यक्ष अमोल जगधने आरपीआयचे संगमनेर अध्यक्ष आशिष शेळके, कुंदन माळी, सचिन सोनवणे, विजय मोरे, विजय सोनवणे, तान्हाजी खैरे, विजय जाधव, विलास मोरे, रामा पवार,जालिंदर गवळी, विक्रम माळी, मिलीद मोरे, रामदास बडे आदि मान्यवरांसह संघटनेचे कार्यकर्ते,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.