व्यसनमुक्तीवर राज्यस्तरीय खुली पोस्टर स्पर्धेचे आयोजन
नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सोमवार दि.14 मे रोजी छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, व्यसनमुक्तीवर राज्यस्तरीय खुली पोस्टर स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली.
जयंती उत्सवा निमित्त गावातील नवनाथ मंदिर परिसरात शाहिरी जलसा कार्यक्रम रंगणार आहे. संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर शाहिर पोवाडे सादर करणार आहे. या कार्यक्रमाद्वारे व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुण हत्या, स्वच्छता अभियान, मुलगी शिकवा... मुलगी वाचवा आदिंसह महिला सक्षमीकरणावर प्रबोधनात्मक पोवाडे होणार आहे.
युवकांना व्यसनापासून लांब राहण्याचे आवाहन करण्याकरीता व त्याचे दुष्परिणाम सांगण्यासाठी व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना जयंती दिनी संस्थेच्या वतीने रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. व्यसनमुक्तीवर आकर्षक घोषवाक्यांसह, हातानी बनवलेले पोस्टर डोंगरे संस्थेच्या निमगाव वाघा येथील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे 9226735346 या नंबरवर संपर्क सधावा. प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम दि. 10 मे पर्यंन्त राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव मंदा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, गौतम फलके, ऋषीकेश बोडखे, सचिन जाधव, मयुर काळे, सोमनाथ डोंगरे, अक्षय पवार, सोमनाथ डोंगरे आदि परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.