… आणि वाकणवाडी वस्तीशाळेचा झाला कायापालट!
सरपंच वर्षा तापकीर, उपसरपंच लक्ष्मी तापकीर, माजी सरपंच प्रविण तापकीर यांच्या पाठपुराव्यामुळे शाळेचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले. काकासाहेब तापकीर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी बलभिम पठारे, विष्णू तापकीर, राजेंद्र तापकीर, सुनिल तापकीर, प्रकाश पठारे, ज्ञानदेव भालसिंग, अभिजित तापकीर, वैभव तापकीर, शुभम पठारे, अमृत पठारे, चंद्रकांत तापकीर, कुशाबा वायसे, शहाजी पठारे, सतिष भालसिंग, सुरेश पठारे, कुंडलिक पठारे, प्रशांत तापकीर, विठ्ठल तापकीर, अमोल गांगर्डे आदी उपस्थित होते. आकर्षक रंगकाम, रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून बोलक्या भिंती, पूर्ण ग्राऊंडला बसवलेले पेव्हिंग ब्लॉक, शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, डिजिटल क्लास रुम या सुविधांमुळे या शाळेचा कायापालट झाला आहे. शाळा आता चकाचक झाली असून येत्या जूनमध्ये विद्यार्थी या विद्यामंदिराचा लाभ घेणार आहेत. याबद्दल पालकांनी शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद दिले.
