Breaking News

जनतेने ‘आर्युवेद’चे फायदे समजून घ्यावेत : आरोग्यमंत्री नाईक

कोपरगाव : ग्रामीण भागात आयुर्वेदिक सुविधा उपलब्ध करून देऊन डॉ. आव्हाड यांनी समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आज कोपरगाव येथील धन्वंतरी आयुर्वेदिक हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आयुर्वेदाचे फायदे जनतेने समजावून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

केंद्रीय आरोग्यमंत्री नाईक यांनी येथील डॉ. रामदास आव्हाड यांच्या धन्वंतरी आयुर्वेदिक हॉस्पिटलला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्या ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद हॉस्पिटल उभारण्यास परवानगी दिली आहे. देशभरात ६५० आयूर्वेदिक हॉस्पिटल्सची निर्मिती केली आहे. याठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करून देशात १७ हजार डॉक्टरांना रोजगार उपलब्ध करून दिला. जुन्या हॉस्पिटलचे नूतनीकरण करण्यासाठी खर्चाची तरतूद केली आहे. जनतेला परवडेल, अशा कमी खर्चात जेनेरिक औषधाच्या निर्मितीची परवानगी दिली आहे. यावेळी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.