Breaking News

शेतक-यांच्या भल्यासाठी त्रास सहन करू : काळे

कोपरगाव ता. प्रतिनिधी - देर्डे को-हाळे व तालुक्यातील इतर १० गावांमधून जाणार असलेल्या समृद्धी महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना मोबदला म्हणून कोट्यावधी रुपये मिळवून दिले. शेतक-यांच्या जमिनीला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाबरोबर कायदेशीर व रस्त्यावरची लढाई लढलो. यात त्रासही झाला आणि आजही होत आहे. पण शेतक-यांचे भले होणार असेल तर कोणताही त्रास सहन करू, असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील देर्डे को-हाळे ग्रामपंचायत निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ युवानेते काळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सभापती अनुसया होन होत्या.याप्रसंगी राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक कचेशवर डूबे, सरपंच योगीराज देशमुख, उपसरपंच कृष्णा शिलेदार, बाबुराव कोल्हे, मोहनराव आभाळे, पाराजी होन, बाळासाहेब घुमरे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, सोपानराव आभाळे, वसंतराव आभाळे, चांगदेव होन, पोपटराव गुंड, सदस्य सतिष दिघे, रविंद्र माळी, संजय विघे, लता डूबे, मनीषा डूबे, पूजा काळे, सुनीता शिंदे, केशव विघे, गौतम विघे, उमाकांत शिलेदार, सुदाम डूबे, डॉ. नरेंद्र देशमुख, शामराव शिलेदार, काशिनाथ डूबे, अर्जुन दिघे, वसंत शिंदे, शांताराम डूबे, केशव विघे, आनंदा विघे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान डूबे यांनी केले. प्रास्तविक सरपंच योगीराज देशमुख यांनी केले. ठेकेदार केकान यांनी आभार मानले.