Breaking News

न्यायालय अवमानप्रकरणी ग्रामस्थांची नगरपरिषदेला नोटीस

संगमनेर / प्रतिनिधी - नगरपरिषद आणि संगमनेर खुर्द येथील ग्रामस्थांमधील हरित लवादातील वादाचा निकाल संगमनेर खुर्द ग्रामस्थांच्या बाजूने लागला. त्यानुसार हरित लवादाने नगर परिषदेला संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात निर्णय दिला होता. परंतु संगमनेर नगरपरिषदेने या आदेशावर कुठलीही कारवाई केली नाही . त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संगमनेर खुर्द येथील ग्रामस्थांनी नगरपरिषदेला नोटीस दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर खुर्द ग्रामस्थांचा येथील कचरा डेपोला तीव्र विरोध होता. त्यामुळे हे प्रकरण हरित लवादापर्यंत गेले होते. त्यानुसार हरित लवादाने दि. ११ जानेवारी २०१८ रोजी संगमनेर पालिकेला नोटीस बजावली. तीन महिन्यांच्या आत डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास तसेच दोन महिन्यांच्या आत कुरण येथील अधिकृत कचरा डेपो सुरु करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता ही मुदत उलटूनदेखील पालिकेने यासंदर्भात काही कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पालिकेला सदरील नोटीस बजावली. कृती समितीचे ऍड. एस. एस. वैद्य यांच्या मार्फत पालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे.