चंद्रपूर जगातील सर्वात उष्ण शहर
पुणे : सध्या वातावरणातील बदलाचा हवामानावर विपरित परिणाम होत आहे. वातावरणातील बदलामुळे देशातील अनेक भागांतील कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सध्या देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अनेक भागातील कमाल तापमान सरासरीच्या ६ ते ७ अंशांनी पुढे सरकल्याने अनेक भागांत उकाडा वाढला आहे. चंद्रपुरात ४५.९ अंश तापमानाची नोंद झाली असून, हे मागील २४ तासांतील जगातील सर्वात उष्ण शहर ठरले असल्याचे अलडोरॅडो वेदर या अमेरिकन हवामान विभागाने जाहीर केले आहे.