पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून, भारतामध्ये या दरवाढीने एक नवा विक्रम तयार झाला आहे. शुक्रवारी पेट्रोलमध्ये एका पैशाची वाढ व डिझेलमध्ये ४ पैशांची वाढ झाल्याने आता पेट्रोल गेल्या ५५ महिन्यांच्या तुलनेत सर्वात जास्त किमतीवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे डिझेलची किंमतही सर्वात जास्त झाली आहे.इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटरला ७४.०८ रुपये झाली आहे. ही किंमत सप्टेंबर २०१३ पासून आतापर्यंतच्या किंमतवाढीनुसार सर्वात जास्त आहे