नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - नेवासा येथील रघुजन गॅस सर्व्हिसच्या वतीने ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत एल पी जी पंचायत स्थापने निमित्त उज्वला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुटे नगराध्यक्षा , संगीता बर्डे , निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, भाऊसाहेब पटारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रघुजन गॅस सर्व्हिसचे मुख्य संचालक डॉ. लक्ष्मणराव इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. रघुजन गॅस एजन्सी मार्फत आजपर्यंत 2213 लाभार्थीना उज्वला योजनेचा लाभ मिळवून दिला आहे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार तालुक्यात सुमारे 1200 ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे अशी माहिती दिली. उज्वला योजनेअंतर्गत सुमारे सव्वाशे लाभार्यांना गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी अजय शिंदे गॅस वापरा बाबत घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की याआधी चूल व धूर यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे जीवन घातक बनले होते मात्र पंतप्रधान मोदी यांनी यावर पर्याय म्हणून उज्वला सारखी योजना सुरू करून पर्याय काढला शंभर रुपयाच्या सहभागातून गोरगरीब गरजूंसाठी ही योजना सुरू केल्याने सर्व सामान्य कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून समाजहिताच्या प्रभावी योजना तळागाळात पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर,नगराध्यक्षा संगीता बर्डे,नगरसेवक सुनील वाघ, पुरवठा निरीक्षक बुद्धानंद धांडोरे, वनायक गोरे, जायकर,कावेरी शिंदे यांनी लाभार्थी व उज्वला योजनेच्या उपक्रमाचे कौतुक आपल्या भाषणातून केले. यावेळी रमहुभाई पठाण,डॉ.लक्ष्मणराव खंडाळे, देविदास साळुंके,नमा पाटील कडू,रम्हुशेठ पठाण बाळासाहेब डहाके,नगरसेवक दिनेश व्यवहारे,डॉ.सचिन सांगळे, सचिन नागपुरे,भारत डोकडे, रणजित सोनवणे,प्रविण नहार सुनील धायजे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर रघुजन गॅस सर्व्हिसचे व्यवस्थापक प्रभाकर आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले
उज्वला दिनानिमित्त गॅसचे वितरण.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:11
Rating: 5