Breaking News

कास्टिंग काऊच संसदेतही खा. रेणुका चौधरी यांचा खळबळजनक दावा


नवी दिल्ली - कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदही कास्टिंग काऊचमधून सुटलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होते असे नाही. ते प्रत्येक ठिकाणी होते. संसदही कास्टिंग काऊचमधून सुटलेली नाही. या मुद्द्यावर देशाने एकत्र येणे गरजेचे असून, चश ढेे चळवळ उभी रहायला पाहिजे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या. सरोज खान यांनी कास्टिंग काऊचचे समर्थन केले होते. असे प्रकार बाबा आदमच्या काळापासून सुरू आहेत. हे नवीन नाही. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. सरकारी खात्यातील लोकही हे करतात. तुम्ही फक्त फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी देते. बलात्कार करुन सोडून देत नाही. हे मुलीवर अवलंबून आहे की, तिला काय करायचे आहे. तिच्याकडे कला आहे तर तिने स्वत:ला का विकावे? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची सर्वस्व आहे. असे सरोज खान सांगलीमध्ये एका कार्यक्रमात म्हणाल्या.