Breaking News

जनसेवा फाऊंडेशनचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलला


जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने ६ मे रोजी नगरच्या वॉडीया पार्कमध्ये आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख व रुपरेषा लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती जनसेवा फाऊंडेशनच्या सूत्रांनी दिली. लेक वाचवा अभियानाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरुपात नगरला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जय्यत तयारीही सुरु होती. सुप्रसिद्ध अजय-अतुल यांच्या गाण्यांची मेजवानी नगरच्या रसिकांना उपलब्ध करण्यात आली होती. सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर, भाऊ कदम यांची कॉमेडी, अमृता खानविलकर हे नामवंक कलाकर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तथापि, अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.