Breaking News

शहरटाकळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत एटीएम सुविधा


भाविनिमगाव, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक व ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या विशेष प्रयत्नातून शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील जिल्हा सहकारी बँक शाखेच्या एटीएम सेवेचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर प्रगतशील शेतकरी आबासाहेब राऊत यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सेवा सोसायटी चेअरमन अ‍ॅड .अनिल मडके, व्हा.चेअरमन प्रशांत वेलदे, संचालक राजेंद्र काकडे, राजेंद्र बरबडे, संतोष शेटे, बाळासाहेब खंडागळे, अनिल खंडागळे, उमेश वैद्य, गंगाधर गवळी, गंगाधर देशमुख, रामप्पा गिरम, अण्णासाहेब मिसाळ, बँक इन्स्पेक्टर भाऊसाहेब गवळी, शाखा अधिकारी अशोक वाघ, कॅशियर रमेश वखरे, कर्मचारी इरशाद पठाण, राजेंद्र निळ, इसाक शेख, सोसायटी सचिव रामकृष्ण दारकुंडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.