Breaking News

नेवासा येथे अत्याचाऱाच्या घटनेच्या निषेधार्थ सर्व धर्मीयांचा मूक मोर्चा



नेवासा, कठुआ व उन्नाव येथे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचार व खुनाच्या प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशीची शिक्षा होऊन कडक कारवाई करण्यासाठ नेवासा तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वधर्मीयांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांनी येथील बसस्थानकापासून मुक मोर्चा काढण्यात आला. जम्मु काश्मीर मधील कठुआ येथे काही नराधमांनी मुस्लीम आदीवासी समाजातील आठ वर्षाच्या मुलीवर आठ दिवस अत्याचार करून हत्या करण्यात आली होती तर उन्नाव येथे देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. मनसुन्न करणार्‍या या घटनेने संपुर्ण देशात खळबळ उडाली होती. अशा प्रकारच्या घटनांमध्ये केवळ कायद्यात पळवाटा असल्यानेच आरोपींना पळवाट मिळत असल्याने कडक कायदे करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे



यावेळी नेवासा तहसील कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखधान, नगरसेवक सुनील वाघ, अनिल पेचे, महंमद अतार,इम्रान दारुवाला, अल्ताफ पठाणयांनी वरील घटनेतील आरोपींनी माणुसकीला कळिमा फासणारे कृत्य केले असल्याने त्यांना कठोर शासन करण्यात येऊन फाशी देण्याची मागणी केली. नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना सदरचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी सतीश गायके, अब्बास बागवान, नगरसेवक लक्ष्मण जगताप, फारूक आतार, रणजित सोनवणे, राजेंद्र उंदरे, बाळासाहेब कोकणे, सतीश चुत्तर,राणा सचदेव,वसीम भंगारवाला,मुसा इनामदार,जमीर सय्यद,शाहरुख शेख, अज्जू पठाण,नासिर इनामदार,शरीफ शेख,हारून जहागीरदार,मुन्ना शेख, अब्दुल्ला सय्यद, भैय्या शेख, आयाज पठाण, इम्रान बागवान,गणी पिंजारी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.रात्री बस स्थानकापासून कॅडलमार्च काढण्यात येवून श्रध्दांजली वाहण्यात आली यावेळी स्वप्नील मापारी, सचिन भांड,गणेश घोरपडे, सोमेश मापारी, राहुल शिंदे आदिंनी सहभाग घेतला.