Breaking News

माजी न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे निधन मानवी हक्कांच्या रक्षणासाठी योगदान

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. देशातील मुस्लीम नागरिकांच्या स्थितीबद्दल अभ्यास करण्यासाठी सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सच्चर गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वस्थामुळे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी बारा वाजण्यास सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 6 ऑगस्ट 1985 ते 22 डिसेंबर 1985 याकाळात राजेंद्र सच्चर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. निवृत्तीनंतर त्यांनी मानवी हक्कांसाठी काम करणार्‍या संस्थासोबत स्वत:ला जोडून घेतले. डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील मुस्लीमांच्या प्रश्‍नांवर अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. सच्चर समितीने 403 पानांचा अहवाल संसदेला सादर केला होता.