Breaking News

घुसखोरीप्रकरणी 18 निर्वासित रोहिंग्यांना अटक

आगरतळा - देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुरुवारी त्रिपुरामध्ये 18 निर्वासित रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 4 मुलांचा आणि 3 महिलांचाही समावेश आहे. ही कारवाई त्रिपुराच्या खोवई जिल्ह्यात करण्यात आली. म्यानमारमधील संबंधित रोहिंग्यांनी त्रिपुरा-बांग्लादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यांना तलियामुरा परिसरात अटक करण्यात आली. त्रिपुरातील पोलीस उपनिरिक्षक रंजित डेबनाथ यांनी सांगितले की, काही मुस्लीम समुदायातील लोक रोहिंग्या असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. ते बसमधून गुवाहटीला चालले होते. त्यामुळे आम्ही ती बस थांबवली. तपासणीदरम्यान आम्हाला म्यानमारमधील 11 पुरुष आणि 4 मुलांसह 3 महिला आढळून आल्या. त्यातील 6 जणांना त्यांचे ओळखपत्र दाखवता आले मात्र इतरांना आपली ओळखपत्रे दाखवता आली नाही. ओळखपत्रांवरून हे लोक म्यानमारचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची हालचाल संशयास्पद असून आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. अटक करण्यात आलेल्या निर्वासितांपैकी एक सैफुल्लाने सांगितले की, मी माझ्या बहिणीसह 6 महिन्यांपुर्वी भारतात आलो आणि दिल्लीत राहात होतो. आम्ही मुळचे म्यानमारचे असून कामाच्या शोधात इकडे आलो. आम्ही 8-10 दिवसांपुर्वी आगरताळामध्ये प्रवेश केला पण कोणत्या सीमेवरुन केला या विषयी मला कल्पना नाही.