Breaking News

नक्षल विरोधी पथकाने जप्त केला काडतुसांचा साठा

सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील मोसम जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात लपवुन ठेवलेल्या काडतुसांचा साठा नक्षल विरोधी पथकाने जप्त केला आहे. अनुचित प्रकार घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी लपवून ठेवलेला साठा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नक्षल्यांची मोठी कारवाई उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील मोसम येथे बॉम्ब शोधक शोधमोहीम राबवित असताना मोसम येथील जंगलात तब्बल 138 जिवंत काडतुसे आढळून आली. अत्याधुनिक बंदुकीत वापरली जाणारी जिवंत काडतुसे तसेच वायर आणि इतर साहित्य कपड्यात गुंडाळून जंगलात लपवुन ठेवलेले होेते. मोठी घटना घडविण्यासाठी नक्षल्यांनी सदर साहित्य लपवुन ठेवल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.