Breaking News

अंतिम परीक्षेपूर्वीच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात असलेल्या विविध विभागातील ७५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हीव द्वारे विविध नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अंतिम निकालापूर्वीच निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे .यांनी दिली.

या मध्ये गुरुदत्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रा., नाशिक, वी. आर.डी. ई., अहमदनगर,होलम केके एक्सट्रुजन, रांजणगाव, एस.आर. के.के. पीकॉक टेकनॉलॉजि, फेस पुणे, ग्लोबनेट सोल्युशन्स मुंबई,जॉन डियर, पुणे,टेकनोग्रोथ प्रा. ली. पुणे,सीएमएस आय टी सर्विसेस प्रा. ली. कल्याण, इम्पल्स टेकनॉलॉजि पुणे, लुपिन फार्मास्युटिकल ली. तारापूर, होम फस्ट फायनान्स को. मुंबई अश्या नामांकित कंपन्यांनमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातिल ७५ विद्यार्थांची निवड होऊन त्यांना नोकरीचा प्रस्ताव मिळालेला आहे. त्याच बरोबर महाविद्यालयाचा अनेक नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार झालेले आहे ज्यामुळे अशाच अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्हस महाविद्यालयात होणार आहे अशी माहिती प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. भागसेन पर्वत यांनी दिली. ह्या सर्व विद्यार्थांनी या यशाचे श्रेय प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयाला दिले.
प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे म्हणाले कि, प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये मुलांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतो ज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.
वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री , युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, महासंचालक . डॉ. सर्जेराव निमसे, मुक्यकार्यकारी अधिकारी. डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.