Breaking News

जिल्ह्यात 11 मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार


जिल्‍हयात सध्‍या स्‍थानिक प्रश्‍नांच्‍या संदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांचे वतीने उपोषण, मोर्चा, रस्‍तारोको, इत्‍यादी प्रकारचे आंदोलनात्‍मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच दिनांक 30 एप्रिल 2018 रोजी बुध्‍द पोर्णिमा व 1 मे 2018 रोजी महाराष्‍ट्र दिन आहे. तसेच जिल्‍हयात ठिकठिकाणी उरुस व यात्रा असून हे उत्‍सव जिल्‍हयात सर्वत्र मोठया उत्‍साहाने साजरा होत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्‍हयात महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक 27 एप्रिल 2018 ते दिनांक 11 मे 2018 या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी लागू केले आहे.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून अपर जिल्‍हादंडाधिकारी श्री. निचित यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे,लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सध्‍यता अगर नितीमत्‍ता यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे, अथवा सोंग आणणे,जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य.शासकीय सेवेतील व्‍यक्‍तीना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांचे आदेशानुसार कर्तव्‍य पुर्तीसाठी हत्‍यारजवळ बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव लाठी अगर काठी वापणे आवश्‍यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्‍यास ज्‍यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना लागू होणार नाहीत