Breaking News

‘भारत बंद’ दंगलीला केंद्र सरकार जबाबदार भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची टीका

पुणे : सोशल मीडियावरील चुकीच्या मेसेजमुळे आज जो बिहार आणि परिसरात जे दंगे झाले त्याला सर्वस्वी सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पुण्यात सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केला. सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, की सोशल मीडीयावर जो भारत बंदचा संदेश फिरत असून त्याच्या नावाखाली लोकांची माथी भडकवली जात आहेत, हे चुकीचे आहे. अशा परिस्थितीमुळे हा देश सीरियाकडे वाटचाल करत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. देशातील परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात आहे. या देशाला कुणी नेता राहिला लनाही. सर्व जाती-जातीत विभागले गेले आहेत. त्यामुळे हा देश हळूहळू सीरियाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन बोलण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. देशात जी दंगल झाली त्याला सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, कारण केंद्र सरकारने अ‍ॅट्रॉसिटीबद्दल फेरयाचिका दाखल केली, पण त्यांनी स्वत:ची भुमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे दलित समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. आरएसएस व मोहन भागवत यांच्याविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले, की भागवत कधी खरे बोलत नाहीत. संघाचा खरा इतिहास हा खोटे बोलण्याचा आहे. संघाचे स्वयंसेवक हे हातात लाल आणिनिळा रंग घेऊन फिरतात व लोकांना लाल पाहिजे का निळा असे प्रश्‍न विचारतात. यातली खरी मेख काय आहे, याचा खुलासा संघाने करावा. तसेच संघाची पहिली शिकार मी असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.