Breaking News

श्रीरामपूर तालुक्यात विविध ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यात विविध ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध उपक्रम राबिण्यात आले. बेलापूर शहरातील विविध रस्ते, आणि झेंडा चौकांत लावलेल्या झेंड्यामुळे वातावरण फुलूण गेले होते. दरम्यान युवकांनी दुचाकी फेरी गावातून काढण्यात आली होती. डॉ.आंबेडकरांची गावातुन विविध पणे मिरवणूक काढण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थित महामानवास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच पढेगांव रस्तालगतच्या संघर्ष तरुणच्या वतीने डॉ. आंबेडकरांना प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीचे औचित्य साधुण बेलापूरकरांच्या आरोग्याची सतत काळजी घेणार्‍या 43 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा तरुण मंडळाच्या वतीने अपघात विमा उतविण्यात आला. सदर पॉलिसी वितरण पञकार देवीदास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच भरत साळुंके, पं.स. सदस्य अरुण नाईक, सुधीर नवले, अभिषेक खंडागळे, भास्कर बंगाळ, पञकार सुहास शेलार, दिलीप दायमा, यांच्यासह विजय शेलार, संजय शेलार, शशिकांत तलोरे, गोपाळ जोशी, जावेद शेख यांच्यासह मंडळाचे कार्यकते हजर होते. दरम्यान माहिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


उक्कलगावांतही विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्णहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले होते. न्यु इंग्लिश स्कूल उक्कलगाव विद्यालयात, पञकार शरद थोरात यांच्या शुभहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य तागड , गुलाबराव गाडेकर, एस.टी. गाडेकर, शिंदे , थोरात , आदींच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली. पटेलवाडी तरुण मिञ मंडळाच्या वतीने महामानवास अभिवादन करुण मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुण मिञ मंडळाचे पदाधिकारी, गावातील पदाधिकारी हजर होते. एकलहरे येथील आठवाडी परिसरातील रमाई भिम गर्जना तरुण मिञमंडळाच्या पुतळा स्थापना करुण विविध मान्यवरांच्या हस्ते पुजा व पुष्पहार घालुन करुण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला.