Breaking News

सरकारी अन्याय अत्याचार समितीची मदत घ्यावी- शिंदे


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- समाजावर होणार्‍या अन्याय, अत्याचाराची प्रकरणे थांबविण्यासाठी प्रत्येक जिल्हयात कार्यरत असलेल्या सरकारी अन्याय अत्याचार समितीची मदत घेतली पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी केले. राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या राष्ट्रीय संघटनेद्वारे तालुकास्तरीय प्रबोधन संमेलन घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अध्यक्ष सुरेश चौदंते, चंद्रकांत परदेशी, मल्लू शिंदे, सलजाता चौदंते, सुरेश भोसले, अशोक बोरुडे, उत्तमराव रणपिसे, नासीर शेख, डॉ.पठारे, दाविद गायकवाड, पोपट खरात, गोरख हिवराळे, संतोष शिरसाठ, सुधाकर भोसले, एम.एस.गायकवाड, सोहेद ससाणे, वसंतराव रणशूत, आदि उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले की, संघटनेने तालुकास्तरावर कामे केली पाहिजे. समाजात कायद्याविषयी जागरुकता आणणे गरजेचे आहे. हा समाज प्रवाहात येणे गरजेचे आहे. या संघटनेचे श्रीरामपूर तालुक्यात चांगले कार्य असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. यावेळी मल्लू शिंदे म्हणाले की, भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. 42 जातींना एका विचारावर आणून ठेवून मुख्य समाज प्रवाहात आणण्यासाठी फुले, आंबेडकर चळवळीतील सुज्ञ सामाजिक क्षेत्रात कार्य करणा्या कार्यकर्त्यांना पुढे आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश भोसले यांनी केले. सुत्रसंचलन एम.एस.गायकवाड यांनी केले तर आभार अशोक बोरुडे यांनी मानले.