Breaking News

काबूल आत्मघाती स्फोटात 31 ठार


काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात 31 नागरिक ठार झाले तर 54 जण गंभीर जखमी झाले. अफगाणिस्तानमध्ये ऑक्टोबंर महिन्यात निवडणूका होणार असून त्यासाठी सध्या मतदान नोंदणी सुरू आहे. अशाच एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट झाला. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याच वेळी एका आत्मघातकी हल्लेखोराने रस्त्यात गर्दीच्या ठिकानी उभं राहून स्वत:ला उडवून दिल्याची माहिती काबूलचे पोलीस प्रमुख दाऊद अमीन यांनी दिली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर स्फोट झाल्यामुळे, अफगाणिस्तानमध्ये मतदानाद्ारे सरकार स्थापन होऊ नये, अशीच दहशतवाद्यांची भूमिका असल्याचे दिसून येत आहे.