नवी दिल्ली : कठुआ बलात्कार पीडितेची ओळख उघड करणार्या प्रसारमाध्यमांना दिल्ली उच्च न्यायालयाने 10 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.ज्या प्रसारमाध्यमांनी कठुआ बलात्कार पीडितेचे नाव व इतर बाबी उघड केल्या त्यांना न्यायालयाने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. बलात्कार पी डिताची ओळख उघड केल्यास 6 महिन्यांसाठी तुरुंगवास होऊ शकतो असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. कठुआ बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी न्यायालयाची माफी मागितली आहे. माध्यमातील नियमांनुसार बलात्कार पीडितेचे नाव उघड करता येत नाही. दंडाद्वारे जमा होणारी रक्कम दिल्ली उच्च न्यायालय जम्मू काश्मीर नुकसानभरपाई मोहिमेत जमा करणार आहे.