Breaking News

जीप ड्रायव्हर ने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक

शेवगाव (प्रतिनिधी) -मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे गाडीत विसरल्याने हतबल झालेल्या कुटुंबास तरुणाच्या प्रामाणिकपणाणे आधार मिळाला. याबाबत सवि÷स्तर माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथे राहणारे आश्रुबा जगन्नाथ आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे ते पाथर्डीला बस्त्यासाठी आले असता ज्या जीप गाडीतुन आले त्याच जीप गाडीत विसरले होते परंतू चालक जांभळी येथील उध्दव नामदेव आव्हाड या तरूणास ती पैशाची पिशवी सापडली असता त्याने त्यांचा शोध घेऊन पैसे हरवले म्हणून रडत असलेल्या मुलीच्या आईच्या हवाली करून माणुसकीचे दर्शन घडवले.यामुळे उध्दव 
याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.