Breaking News

राक्षसवाडी येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नामदार शिंदेचे श्रमदान


राक्षसवाडी येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना जलसंधारणमंत्री ना. प्रा.राम शिंदे यांनी श्रमदान करत गावाला प्रोत्साहन दिले.राक्षसवाडी येथे शेकडो ग्रामस्थ श्रमदान करत असताना ना. शिंदे यांनी या कामाचे ठिकाणी बुलेटवर एन्ट्री करत सर्वांना आचंबीत केले. यावेळी शांतिलाल कोपनर यांनी वॉटरकप स्पर्धेतील कामांबाबत माहिती देताना केलेले काम दाखविले. यावेळी ना. शिंदे यांनी श्रमदान केले. त्यांचेसमवेत प्रांतअधिकारी अर्चना नष्टे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, जिल्हा माहिती अधिकारी दीप चव्हाण, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, तालुकाध्यक्ष अभय बोरा व प्रकल्प संचालक आशिष बोरा यांचेसह रोटरीचे नितीन देशमुख, डॉ. राजेंद्र खेत्रे, सहा.गट विकास अधिकारी रूपचंद जगताप आदींसह पानी फाऊंङेशन टीम तालुका समन्वयक अमोल लाङगे, योगेश अभंग, बाळासाहेब बगाटे, जयदिप जगताप, मगेश पिचङ, बाळासाहेब पाङे व डॉ. सुनील गावडे, सरपंच अश्‍विनी संदीप भवाळ, उपसरपंच पद्ममताई बाराटे, अ‍ॅड.पाराजी कोपनर, दिनकर कोपनर, सीताराम कोपनर, बाळासाहेब सोलणकर, सुदर्शन कोपनर, बंडा मोरे, देवीदास कोपनर, यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.