राहुरी : तालूक्यातील बारागांव नांदूर मुळा नदीपात्रातील लिलाव घेतलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी कच्चा रस्ता बनवित असतांना चार जणांनी काम बंद पाडून दमदाटी केली आणि कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारागांव नांदूर येथील एकनाथ विक्रम बर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळा नदीपात्रातील वाळूचा लिलाव नंदूकुमार कचरु गागरे यांनी घेतला अाहे. त्या लिलावातून बारागांव नांदूरला आर्थिक कर मिळणार आहे, म्हणून मुळा नदी ते बारागांव नांदूर कच्चा रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. एकनाथ बर्डे यांनी सुभाष माळी, किशोर माळी व इतर दोणजणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वाळू लिलाव प्रकरणी धमकी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5