Breaking News

… तर दंडुके मोर्चा काढावा : महाडिक


राहुरी : मराठा आरक्षणा बाबत मुख्यामंत्र्यासोबत तीन वेळा बैठक झाली.त्यामध्ये उपायही सुचवले. परंतु अद्याप कोणताही तोडगा मुख्यमंत्र्यांनी अद्याप काढला नाही. २८८ आमदारांपैकी १४६ आमदार मराठा समाजाचे असून तेही आता मुके झालेले दिसत आहेत. शासन मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी वेळ काढूपणा करत असेल तर मराठा समाजाला आता दंडुके मोर्चा काढावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक विजय सिह राजे महाडीक यांनी दिला. अखिल भारतीय मराठा सेवा संघ आयोजित वांबोरी येथील मराठा आरक्षण वं शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खा. प्रसाद तनपुरे म्हणाले, न्याय मागण्यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढल्याने सरकारचे नाक कापले गेले. परंतु मुख्यमंत्री अतीहुशार आहेत. कोणतेही आंदोलन मोडीत कसे काढायचे, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. शेत मालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. याप्रसंगी सुभाष जावळे, प्रदेश अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले, सुभाष गागरे, बाळासाहेब पटारे, कृष्णा पटारे, बाबासाहेब भिटे आदी उपस्थित होते.