Breaking News

जळगांव येथे चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

जळगांव, दि. 10 एप्रिल -  शहरातील सिंधी कॉलनीत कुल्फी विक्रेत्याच्या दुकानावर चार्जिगसाठी लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली. दरम्यान हप्त्याभरात शहरात दुसरी घटना घडल्यामुळे अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. जळगांवतील वाढत्या उष्णतेमुळे स्फोट होत असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव येथे मागील आठवड्यात शनिपेठ परिसरातील तरुणाच्या खिशात मोबाईल स्फोट झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा सिंधी कॉलनीत विजय चौहान याने त्यांचा कार्बन कंपनीचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला असता, त्याचा स्फोट झाला आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. मोबाईल हा कंपनीकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान जळगावमधील दिवसें दिवस वाढणा-या उष्णतेमुळे मोबाईल स्फोट होत असल्याचे तर्क लढविले जात आहेत.