Breaking News

बेलपिंपळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


बेलपिंपळगाव प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9 वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मानवंदना दिली सायंकाळी 6 वा ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजीत सजवलेल्या गाडीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर,शिवाजी महाराज, फुले,शाहू महाराज यांच्या प्रतिमेची गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महिला, मुली, मूले, अबाल वृद्ध यांनी मिरवणूकीची शोभा वाढवली मिरवणूक गावात आल्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी प्रतिमा पूजन केले व मिरवणूकीतील सर्वाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. प्रियंका साठे, पूजा साठे, आरती साठे यांनी मोठ्या उत्साहात महामानवाला धम्मवंदना चे गायन केले. या कार्यक्रमात माजी सभापती दिगंबर शिंदे, यात्रा कमिटी अध्यक्ष चंद्रशेखर गटकळ,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सुखदेव कदम, पोपट पुंड,दत्तात्रय राऊत,संभाजी ब्रिगेड चे गणेश चौगुले, माजी चेअरमन संभाजी शिंदे, सकाहरी शिंदे, दीपक चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस पाटील संजय साठे, साठे वायरमन, माजी चेअरमन भीमराज साठे, किरण साठे, विष्णुपंत शिरसाठ,वसंत साठे,एकनाथ साठे,अशोक साठे,अक्षय साठे,अण्णासाहेब साठे,दिलीप दोंदे,अशोक कांबळे, सागर साठे,संतोष साठे,नंदू साठे, वसंत कांबळे, बाळासाहेब शेंडगे,आदित्य शिरसाठ,गणेश साठे,अविनाश थोरात,बाळासाहेब साठे,बाबासाहेब साठे,अप्पासाहेब साठे,आदी भीम सैनिक होते शेवटी माजी सरपंच राजेंद्र साठे यांनी आभार मानले.