Breaking News

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी राजेश बोरुडे

श्रीरामपूर / प्रतिनिधी, दि. 11, एप्रिल - महाराष्ट्र पत्रकार संघाच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी दैनिक लोकमंथनचे श्रीरामपूर शहर प्रतिनिधी राजेश बोरुडे यांची तर उपाध्यक्षपदी बाबूराम शर्मा निवड करण्यात आली. शिर्डी येथील हॉटेल केबीएस ग्रँड येथे महाराष्ट्र पञकार संघाची जिल्ह्याव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना ओळखपञ, नियुक्तीपञ, विमा पॉलिशीचे मोफत वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आनंदराव जाधव, उत्तम महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास बैरागी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामनाथ जर्‍हाड,उत्तर म.उपाध्यक्ष अशोक दुशिंग,उत्तर म.संपर्क प्रमुख किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ताञय खेमनर,जिल्हा , छायाचिञकार संघटना जिल्हाध्यक्ष किरण शेलार , जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लोखंडे ,अमोल राखपसरे,जिल्हा सचिव राजेंद्र बनकर ,संपर्क प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण ,संघटक राजेंद्र दुनबळे, कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे, राहाता तालुकाध्यक्ष अरुण बाबरे, उपाध्यक्ष अविनाश डोखे आदि उपस्थित होते.