Breaking News

बेलपिंपळगाव येथील सकलदी बाबा यात्रा कमिटी अध्यक्षपदी चंद्रशेखर गटकळ

बेलपिंपळगांव प्रतिनिधी, दि. 11, एप्रिल - नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील सकलदी बाबा यात्रा यावर्षी 19 एप्रिल रोजी होत असून उत्सव कमिटी अध्यक्ष पदी चंद्रशेखर गटकळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रत्येक वर्षी बेलपिंपळगाव येथे गावातील सकलदी बाबा यात्रा मोठया उत्सवात साजरी करण्यात येत असते. ही यात्रा अक्षय्यतृतीया नंतर येणार्‍या गुरुवारी ही यात्रा भरत असते. बुधवारी रात्री गावातील अनेक तरुण गोदावरी नदीचे पाणी आणून देवाला घालतात तसेच चादर मिरवणूक काढण्यात येत असते. गुरुवारी 19 एप्रिल रोजी सकाळी सकलदी बाबा ची यथोचित पूजा करून यात्रा भरते दिवसभर गावातील अनेक भक्त यावेळी दर्शनांसाठी गुरुवारी रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून शुक्रवारी सायंकाळी मंदिराजवळ कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक मल्ल हजेरी लावतात तरी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी ,ग्रामपंचायत, सोसायटी, हनुमान देवस्थान, सकलदी बाबा यात्रा कमिटी यांनी केले आहे. गावातील सुरेगाव रोडला ही यात्रा भरत असते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुठले हि पशुबळी दिले जात नाही. त्यामुळे ही यात्रा शांततेत पार पडली जाते यावेळी गावातील उपसरपंच दीपक चौगुले, चेअरमन संभाजी शिंदे, चेअरमन कल्याण शिंदे, माजी सभापती वसंत रोटे, माजी सभापती दिगंबर शिंदे, बाबुराव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कृषी मित्र एकनाथ भगत, सरोदे सर, शिंदे,सर , सुखदेव कदम, दत्तात्रय राऊत, किशोर बोखारे, विजय शिंदे, मामा सोनार, गणेश चौगुले, प्रकाश शेरकर, विजय सूरसे, भीमराज सूरसे यासह गावातील नागरिक उपस्थित होते.