Breaking News

मुळा एज्युकेशनच्या कृषी महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

सोनई, दि. 11, एप्रिल - मुळा एज्युकेशनच्या कृषी महाविद्यालय सोनईचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मा.आ.दौलतराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. मार्गदर्शन करताना दौलतराव पवार म्हणाले की, पाण्याच्या दोन प्रवाहापैकी संथ प्रवाहातील वाहणारे पाणी हे कोणताही विध्वंस न करता चांगले काम करत असते तर दुसरा प्रवाह हा विध्वंसक प्रकारचाअसतो. मा.खा.यशवंतराव गडाख हे संथ पाण्याप्रमाणे काम करणारे शेतकर्‍यांचे कैवारी आहेत . आजची तरुण पिढी ही अतिशय हुशार व बुद्धिमान आहे म्हणून त्यांनी संशोधनपर दृष्टीकोन ठेवून जिद्दीने अभ्यास करून पदवी मिळवली पाहिजे आणि त्या पदवीचा उपयोग शेतकरी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी नवनवीन संशोधन करून त्यांची शेती किफायतशीर होईल असे विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे. जमिनीची खालावलेली प्रत सुधारण्यासाठी तसेच जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे. शेतकरी कर्जातच शिकतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो त्यासाठी शेतकरी आत्महत्येवर संशोधन होणे आवश्यक आहे. आपल्या मुलामुलींचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचे अवाहन त्यांनी केले यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात उत्तमराव लोंढे म्हणाले की, कृषीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या घरची शेती नियोजनपूर्वक करून आपल्या ज्ञानाचा उपयोग परिसरातील शेतकर्‍यांसाठी करावा. खेळाडू घडला तर देश निश्‍चितच घडेल, या महाविद्यालयातील खेळाडू आज विद्यापीठ, राष्ट्रीय पातळीवर चमकले ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय उल्लेखनीय बाब आहे. यावेळी विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात  आला. याप्रसंगी शितल मेहेत्रे चेरमन विद्यार्थी परिषद, आरती बडे सचिव विद्यार्थी परिषद, प्रा. अनुप दरंदले, प्रा. सोमनाथ दरंदले, डॉ. पतिंग साबळे, प्रा. वरुण कडू, प्रा अंत्रे, प्रा. बोथरे, प्रा. वाघमारे, प्रा. खळेकर, प्रा. गायकवाड, प्रा. ईनामके, प्रा कौलगे, प्रा. जाधव, प्रा. घाडगे, प्रा. भवार, प्रा. लिपणे, प्रा. घावडे, प्रा. गवांदे, प्रा. मुरादे, प्रा. गडाख, प्रा. पाटील, प्रा. दहातोंडे आदीसह सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. योगेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदीप तांबे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.