वाहतुकीचे नियम पाळा : पो. नि. नरसुडे
ते म्हणाले, शिर्डीत कायमच होणारी भक्तांची गर्दी, त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना कमी मनुष्यबळात हे काम करावे लागते. अशावेळी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, टिबल शीट, नोपार्किंग झोन, रॉंग साईडने दुचाकी चालविणे, भरधाव वेगात दुचाकी चालविणे यामुळे अपघात होतात. त्यातून काहींना जीव ही गमवावा लागतो. अशावेळी कर्मचारी वाहनधारकांना नियमांची जाणीवही करून देत असतात. बेशिस्त वाहनधारकांकडून दंड जरी वसूल केला जात असला तरी त्या लोकांना शिस्त लागावी, म्हणून वाहतूक शाखेचे कर्मचारी मार्गदर्शनही करत असतात. शिर्डी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्या मुलांना वय कमी असताना दुचाकी वाहन चालवण्यास पालकांनी देऊ नये. कायद्याने हा गुन्हा असून त्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रामनवमी उत्सवाच्या काळातही शिर्डी वाहतूक शाखेने नियोजन करून वाहतुकीला कुठे ही त्रास होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती.