‘ही’ कारवाई केंद्रीय पातळीवरुन : मुख्यमंत्री
एल्गार परिषदेत जमावाला भडकावल्याच्या आरोपावरून मुंबई, पुणे आणि नागपुरातील कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर पो लिसांनी छापे मारले आहेत. मात्र, हे धाडसत्र एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही. तर, केंद्रीय पातळीवर ही कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यात सुरू असलेल्या धाडसत्राबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही क ारवाई केंद्रीय पातळीवरुन होत असल्याचे म्हटले. दरम्यान, धाडसत्रवरुन दलित आणि विविध गटांनी नाराजी व्यक्त केली आहे.