Breaking News

न्या. लोया प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका करा भाजपचे खासदारांना लेखी आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोहराबुद्दीन बनावट प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी फेटाळल्यानंतर भाजपने आपल्या खासदारांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याबाबत लेखी आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर आरोप केल्याने माफी मागावी अशीही मागणी करण्यास सांगितले. भाजपने याबाबत आपल्या खासदारांना एक पत्र पाठवत आपल्या आपल्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेत अमित शाह यांची बदनामी केल्याचा मुद्दा उपस्थित करत माफीची मागणी करण्यास सांगितले आहे. तसेच आपल्या या पत्रासोबत गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी साहित्य देखील पुरवले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमुर्ती खानविलकर, न्यायमुर्ती चंद्रचुड यांच्या खंडपीठाने गुरूवारी न्यायमुर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारी मागणी फेटाळली आहे. न्यायमूर्ती ज्या सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत होते, त्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे देखील आरोपी होते.भाजपचे सचिव बालासुब्रम्हण्यम कामारसू यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या पत्रात प्रत्येक खासदाराला स्थानिक न्युज चॅनलला प्रतिक्रिया देणे, अधिकृतपणे वक्तव्य प्रसारित करणे आणि पत्रकार परिषद घेत अमित शाह यांची बदनामी करण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी करण्यास सांगितले आहे. फेसबुक, ट्विटर या सारख्या समाज माध्यमांच्या वापरासह एसएमएसचा वापर करत अभियान राबण्यास सांगितले आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे ट्विट रिट्विट करण्यास देखील सांगितले आहे.