Breaking News

पहुर येथे प्रेमीयुगलाची आत्महत्या

जळगाव, दि. 11, एप्रिल - जळगांव जिल्ह्यातील पहुर ता.जामनेर येथे लोंढ्री खुर्द येथील मोतीआई धरणाच्या जवळ असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला युवक व  युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी संकाळी उघडकीस आली. युवकाचे नाव अक्षय चौधरी (वय 19) व तर 16 वर्षीय युवतीचे नाव समजलेले  नाही. युवती ही अल्पवयीन आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अक्षय हा वाकोद येथील गौराई कृषी तंत्रज्ञान महा विद्यालयात शिक्षण घेत होता. तर मयत युवती ही पहूर येथे दहावीचे शिक्षण घेत होती. प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.