Breaking News

चोपड्यात डॉक्टरावर प्राणघातक हल्ला

जळगाव, दि. 11, एप्रिल - चोपडा शहरातील नर्मदा नगरातील डॉ.आनंदा पाटील यांच्यावर कौटुंबीक कारणावरुन त्यांच्या रुग्णालयातच एकाने प्राणघातक हल्ला केला.  यामुळे वैद्यकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दि.10 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनतंर आरोपी लगेच तेथून पसार झाला. याप्रकरणी रात्री  उशिरा पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण समजून आले नाही.