Breaking News

अंकुर साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

सोलापूर, दि. 11, एप्रिल - नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंगेश विश्‍वासराव, शकुं तला सोनार, राहुल डंबाळे हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती उपाध्यक्ष कालिदास  चवडेकर व भरतकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार मंगेश विश्‍वासराव यांच्या आता खरा राडा सुरू होत आहे या काव्यसंग्रहास तर गुलबर्गा येथील शकुंतला  सोनार यांच्या माझ्याशीच मीच बोलते या आत्मचरित्रास कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. दलितमित्र सौदागर मोरे स्मृती समाजभूषण  पुरस्कारासाठी आरपीआय युवा मोर्चाचे संस्थापक राहुल डंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 15) समाजकल्याण केंद्र येथे सा हित्य अकादमी पुरस्कार निवड समितीचे सदस्य भालचंद्र शिंदे यांच्या हस्ते वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे शिवा क ांबळे असणार आहेत.