Breaking News

संघटनात्मक बांधणी करण्याचे मनसे पदाधिकार्‍यांस नांदगावकर यांचे आदेश


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तिय मनसे नेते बाळा नांदगावकर हे सध्या संघटना बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्याप्रमाणे शुक्रवारी पारनेर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी पारनेर विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

त्यांचेसमवेत जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, ज्येष्ठ नेते सोपान गायकवाड़, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वरखडे, तालुकाध्यक्ष पप्पु लामखडे, उपाध्यक्ष सतिष म्हस्के, शहराध्यक्ष वसिम राजे, अंकुश गायकवाड़, प्रशांत साळवे, रुपेश ढवण, जालींदर बांडे, मारुती रोहकले, संतोष वाळुंज, अऩिल तरटे, भाऊ देशमाने, राजू औटी, बाळासाहेब पुंडे, संदीप चव्हाण, गोरख टोणगे, कृष्णा शेलार, उत्तम चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सचिन डफळ, सतिष म्हस्के, पप्पु लामखडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष वसिम राजे यांनी केले. 
पारनेर तालुक्यातील कळस, निघोज, पानोली, निघोज, भाळवणी, वाडेगव्हाण, सुपा, वनकुटा, कान्हुर, टाकळी ढोकेश्‍वर, पारनेर शहर या विविध गावांवरुन आलेल्या मनसे कार्यकर्ताच्या भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जाणून घेतल्या. एवढा मोठा नेता पण अक्षरश: खाली कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याची जाणीव झाली होती. यावेळी ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्षांना योग्य मार्गदर्शन करुन कार्यवाहीच्या सुचनाही दिल्या. तसेच प्रत्येक गावातील जुने नवे कार्यकर्ते यांचा समन्वय साधून त्या ठिकाणी मनसेच्या शाखा निर्माण करण्याचा आदेश दिला. ग्रामीण व शहरी यांचा भव्य मेळावा घेण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार नारायण नरवडे यांनी मानले.